शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘सम्राट’वर होणार आता चेन्नईत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:39 IST

कोल्हापूर : आर्थिक परिस्थितीअभावी योग्यवेळी उपचार न केल्याने दृष्टीहीन बनलेल्या सम्राट युवराज पोळ या चारवर्षीय मुलावर चेन्नई येथील शंकर नेत्रालय या अत्याधुनिक रुग्णालयात उपचार करण्यात येणार असून, आज, मंगळवारी त्याचे नातेवाईक व भाजपचे कार्यकर्ते त्याला घेऊन चेन्नईला रवाना होत आहेत.सम्राट पोळ याच्या जीवनात गरिबीमुळे आलेल्या अंधकाराबद्दलची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ...

कोल्हापूर : आर्थिक परिस्थितीअभावी योग्यवेळी उपचार न केल्याने दृष्टीहीन बनलेल्या सम्राट युवराज पोळ या चारवर्षीय मुलावर चेन्नई येथील शंकर नेत्रालय या अत्याधुनिक रुग्णालयात उपचार करण्यात येणार असून, आज, मंगळवारी त्याचे नातेवाईक व भाजपचे कार्यकर्ते त्याला घेऊन चेन्नईला रवाना होत आहेत.सम्राट पोळ याच्या जीवनात गरिबीमुळे आलेल्या अंधकाराबद्दलची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच समाजातील अनेक व्यक्तींनी त्याच्यावरील उपचारास आर्थिक मदत करण्याची तयारी दाखविली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर सर्व खर्च करण्याची तयारी दर्शविली. एवढेच नाही तर चेन्नईसारख्या शहरात त्याला न्यावे लागले तरी तेथे नेऊन उपचार केले जातील, अशी ग्वाही दिली होती.पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ‘सम्राट’च्या डोळ्यांच्या तपासण्या येथील डॉ. अतुल जोगळेकर यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावेळी एका डोळ्याने दिसण्याची शक्यता नाही; परंतु उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यास दिसण्याची शक्यता असून, तो प्रयोग करणे आवश्यक असल्याचा अभिप्राय डॉ. जोगळेकर यांनी दिला होता. दरम्यानच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहायक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनीही त्याचे अहवाल पडताळून त्याला दिसण्याची संधी नाही, असे सांगितले होते.मात्र, डॉ. जोगळेकर यांच्या सल्ल्यानुसार सम्राटला चेन्नई येथील शंकर नेत्रालय येथे दाखल करण्याचा निर्णय पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप कार्यकर्ते विजय जाधव यांनी घेतला. तेथील डॉक्टरांची गुरुवारी वेळ मिळाली आहे. त्यानुसार आज, मंगळवारी त्याला चेन्नईला नेण्यात येत आहे. त्याच्यासोबत त्याचे वडील युवराज, आजी मंगल व भाजपचे कार्यकर्ते सुनील चव्हाण जाणार आहेत.चव्हाण यांना या नेत्रालयातील डॉक्टरांचा परिचय असून, पालकमंत्र्यांच्यावतीने तेच रुग्णांना मार्गदर्शन करण्याचे काम पाहतात.